मुंबई – माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.या अपघात प्रकरणी रसायनी पोलीस कदम यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात या अँगलनं पोलीस तपास करत आहेत.विनायक मेटे यांच्या कार अपघात प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मेटेंचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच झाला होता.
पोस्टमोर्टम रिपोर्टमधून सत्य बाहेर येईल असं त्यांच्या पत्नी ज्योती मेटे म्हणाल्या. तर पुण्यात ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या कारचा २ वाहनांनी पाठलाग केला होता. त्यात एक आयशर ट्रक आणि एर्टिंगा होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. मेटे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ८ पथके नेमली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला दमन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे विनायक मेटे यांच्या कारचालकालाही पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.