निर्जन स्थळांच्या शोधात भटकणाऱ्या प्रेमीयुगलांवर टोळक्यांचा निशाणा

Trending NEWS

सावधान अल्पवयीन मुलींच्या अब्रूवर हल्ले, लुटमार करणारे टोळके सक्रिय

यवतमाळ : एकांतवास शोधण्यासाठी प्रेमीयुगल शहरालगतच्या निर्जन स्थळी धाव घेत आहे. या निर्जन स्थळावर काहीजण टार्गेट करीत असून, मुला, मुलींच्या मौल्यवान वस्तूंसह त्यांच्या अब्रूवर सुद्धा हात टाकत आहे. बऱ्याच वेळा नाहक बदनामी होईल म्हणून तक्रारसुद्धा दिल्या जात नाही. त्यानंतरही एखादी घटना उघडकीस आलीच, तर तक्रारीसाठी काहीजण पूढे येतात. शहरातील बाय पासवर असलेल्या कचरा डेपो परिसरात मंगळवारी रात्री उशीरा घडलेल्या घटनेवरून ही गंभीर बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनीच केवळ कारवाई करणे अपेक्षीत नाही तर पालकांनाही यासंदर्भात गांभीर्याने विचार करुन आपल्या पाल्यांवर लक्ष द्यावे लागणार आहे.शहरातील बायपास मार्गावर लहान भावाला घेवून मित्रांसोबत बोलत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकरणाची तक्रार मध्यरात्री दरम्यान शहर पोलिसांत देण्यात आली. त्यावरुन शहर पोलिसांनी दोन युवकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यातही घेतले आहे. मात्र नुकत्याच घडलेल्या या घटनेने शहराभोवती निर्जन स्थळांच्या शोधात फिरणारे प्रेमी युगुल आणि त्यांना एकांतात गाठून लुटमार करणारे टोळके हा विषय पुन्हा एकदा पुढे आला आहे. अशा निर्जन स्थळी दिसुन येणाऱ्या प्रेमी युगुलांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण आणि लुटमार करणाऱ्यांकडून मुलींच्या अब्रूवर हात टाकण्याचे प्रकारही लक्षणीय वाढले आहे हे विशेष. एकांत वासाच्या शोधात धामणगाव मार्गावरील बोरगाव धरण, दारव्हा मार्गावरील जामवाडी, चौसाळा, आर्णी रोडवरील मनदेव, जांब रोड, गोधनी मार्ग आणि घाटंजी मार्ग यांच्यासह शहराभोवताल असलेला बायपास ह्या जोडप्यांचे अड्डे बनले आहे. या ठिकाणी सहसा कुणी जात नाही. त्यामुळे ह्या परिसरात आपल्याला कुणी ओळखणार नाही, असा समज करुन अनेक जोडपी असे ठिकाण गाठत आहेत. त्यात काही आंबट शौकीनांचाही समावेश असतो. मात्र, याच संधीचा फायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांनी लुटमार सुरू केली आहे. एकांतात सापडलेली जोडपी सहज टार्गेट होत असल्याने या जोडप्यांजवळील पैसे, दागिने, मोबाईल हिसकावून घेण्यात येतात. असे झाल्यावरही घरच्यांना ही बाब माहिती पडेल या भितीपोटी पोलिसांत तक्रारही करण्यात येत नाही. त्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढूच लागली आहे. घरच्यांशी खोटे बोलून प्रियकरा सोबत निर्जन स्थळी गेलेल्या तरुणी ह्या घटनांचा उल्लेखही कुठे करु शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता पोलिसांनी आणि पालकांनीही याकडे लक्ष पुरवण्याची गरज आहे.

लोहाऱ्यातील ती घटना ताजीच
शहरातील लोहारा एमआयडीसी पावर हाऊस परिसरातील निर्जन स्थळी प्रेम प्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. ही घटना मार्च महिन्यात घडली असून यावेळी प्रियकराने चक्क स्वत:च्या हाताची नस, गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *