राज्य शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कोणीही शिक्षणा पासून वंचित राहू नये या करिता विविध उपाय योजना राबविण्यात येतात, याच प्रगतशील उपाययोजना चा बट्याबोळ अकोला शहरात पहावयास मिळाला, शहरातील जुन्या डाएड कॉलेज समोर सर्वशिक्षा अभियानाची शासकीय अभ्यास शाळा स्थापित करण्यात आले होते, या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा याची उचित व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती याच सोबत शालेय विद्यार्थ्यांना मनोरंजन करीता विविध खेळनी बसविण्यात आली होती, परंतु कालांतराने सदर अभ्यास कक्षाला कुलूप लागल्याने सदर इमारत वाऱ्यावर ठेवण्यात आली, आता या ठिकाणी इमारत तर उभी आहे परंतु विद्यार्थ्यांना मनोरंजन करीता बसविण्यात आलेले खेळणी तसेच सम्पूर्ण परिसराच्या सुरक्षे करिता लावण्यात आलेले तारेचे कुंपण मात्र गायब झाले आहे, काही चोरट्याना या ठिकाणी लावलेले लोकांडी गेट कापून न नेता आल्याने ते मात्र जैसे थे स्थितीत उभे आहे, एकीकडे शासन शिक्षनासाठी विविध उपाय योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करते तर दुसरी कडे शहरातील ही इमारत शिक्षणा बाबतीत जिल्यात राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहे, जिल्हाधिकारी यांनी या बाबतीत गांभीर्याने दखल घेत उचित कारवाई करण्याची मागणी शालेय विध्यार्थ्यांन कडून होत आहे.