अकोला : राज्यभरात जन्माष्टमीची धूम असताना अकोल्यात दहीहंडी अनोख्या प्रकारे फोडण्यात आली..शहरातील वसंत देसाई क्रीडांगण येथील तरणतलावात दहीहंडी फोडण्यात आली…या तरणतलावात हौशी पोहणाऱ्या युवकांनी आणि मास्टर पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात गोविंदाचे तीन थर तयार केले होते आणि या नंतर दहीहंडी फोडण्यात आली..आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या दहीहंडीची सर्वत्र चर्चा होत आहे..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्विमिंग क्लबचे संचालक गोपाल पाटील , मनोज पाटील , योगेश पाटील, कार्यालयीन सहकारी मोहिल खरात, ज्योती पनपालिया, तसेच प्रशिक्षक दिपक सदानशिव, विशाल पोहेकर , कोमल कदम , सतीश पांझाडे , प्रमोद खंडारे , दिनेश वाघ अभी टाले , गौरव लोळ , निलेश साबळे , निलेश दूधगम कवसर , तसेच स्विमिंग चे महिला विध्यार्थी व पुरुष विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले..