नागपूर, २० ऑगस्ट : एकतर्फी प्रेमात वेड झालं की कोणत्याही थराला पोहोचतात. प्रेम मिळवण्याची ईर्षा निर्माण होते आणि मग त्यातून वाईट घटना घडतात. नागपुरात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. त्यानंतर नागपूर हादरलं आहे.
एकतर्फी प्रेमातून नागपूरच्या सुरादेवी परिसरामध्ये एका 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. या तरुणीची गळा आवरून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह झुडपात फेकून देण्यात आला. संध्याकाळी तरुणीचा मृतदेह स्थानिकांना दिसला आणि खळबळ उडाली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.मृतक ही खापरखेडा येथील काजल कुकडे असल्याची माहिती मिळाली आहे. ती एका रुग्णालयामध्ये नोकरी करत होती. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
यासंदर्भात पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.