मुंबई, 20 ऑगस्ट- बॉलिवूड भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमानननं अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ऐश्वर्या रॉय, कतरिना कैफ, सोमी अली आणि संगीता बिजलानी यांच्याशी सलमानचं नाव जोडलं गेलं आहे. परंतु सोमी अलीनं सलमानवर अनेक आरोप केले होते. इतक्या वर्षानंतर पुन्हा आता अभिनेत्रीनं सलमानवर आरोप करत खळबळ माजवली आहे.
अभिनेत्री सोमी अलीनं पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर ‘मैने प्यार किया’चं एक पोस्टर शेअर केलं आहे. यासोबतच सोमीनं एक कॅप्शनसुद्धा लिहलं आहे. या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीनं या पोस्टमधून सलमानवर टीका केली आहे.सोमीनं पोस्टमध्ये लिहलंय, ‘ज्या व्यक्तीनं महिलांवर अत्याचार केला. त्यानं केवळ माझ्यासोबतच नाही, तर अनेक महिलांसोबत असं केलं आहे. त्यांची पूजा करणं बंद करा’.असं अभिनेत्रीनं पुन्हा माजवून दिली आहे.सोमी अलीनं आपल्या पोस्टमध्ये पुढं लिहलंय, ‘तो एक मनोरुग्ण आहे. तुम्हाला त्याची कल्पना नाही. सोमी अलीनं 10 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. परंतु आता अभिनेत्रीनं ही पोस्ट डिलीट केली आहे. अभिनेत्रीनं यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती सलमानला डेट करत होती. इतकंच नव्हे तर सोमीनं सलमानवर आपली फसवणूक केल्याचा आरोपही केला होता. अभिनेत्रीनं अनेक गंभीर आरोप करत सर्वांनाच चकित केलं होतं. परंतु इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधत अभिनेत्री चर्चेत आली आहे.