
आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अकोल्यातील रोटरी क्लब मेन, रोटरी मिडटाउन, रोटरी ईस्ट, रोटरी नॉर्थ, रोटरी अॅग्रोसिटी व रोटरी सेंट्रल तसेच रासेयो पथक, एलअारटी वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पथनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत आरएलटी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, शंकरलाल खंडेलवाल कॉलेज, एलअारटी महाविद्यालय, श्री शिवाजी कॉलेज अकोला, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला, श्री शिवाजी कॉलेज अकोट या सर्व संघांनी आपले ‘हर घर तिरंगा’ या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. या स्पर्धेचे रोख बक्षीस, मोमेंटो व सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र अकोल्यातील सर्व रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक रुपये २१०० रुपये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला यांना मिळाला. द्वितीय क्रमांक १५०० रुपये एलअारटी महाविद्यालय, अकोला, तर तृतीय क्रमांक ११०० रुपये श्री शिवाजी महाविद्यालय, अकोट यांना मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर गीते, आरोग्य उपसंचालक डॉ. वारे व गुणवंत देशपांडे यांनी केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर अॅड. सुमित बजाज, प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, अकोला रोटरी एन्क्लेव्ह प्रेसिडेंट डॉ. ज्ञानसागर भोकरे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. येउल, रोटरी क्लब मेनचे अध्यक्ष प्रेमकिशोर चांडक व सचिव राजीव बजाज, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. तेजस वाघेला व सचिव विनीत गोयनका, गोपाल लोहिया, रोटरी ईस्टचे अध्यक्ष ओंकार गांगडे व सचिव विशाल तडस, रोटरी अॅग्रोसिटीचे अध्यक्ष देवाशिष काकड व सचिव नीरज देशमुख, रोटरी नॉर्थचे अध्यक्ष दीपक चांडक व सचिव महेश बाहेती यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी रोटेरियन डॉ. गजानन वाघोडे, डॉ. जे. डी. वाघेला, राधेश्याम मोदी, अभिजीत कडू, प्रा. डॉ. मोना साबू, डॉ. नीलेश चोटिया तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी व प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.