रॅलीमध्ये महिला ची धानाचे टोपले घेऊन नृत्य कला व पथनाट्य दिखावे सादर
अकोट : अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या कुशीमध्ये कलाल समाजाचे प्रगतिशील गाव उमरा येथील कलाल समाजाचा रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साह साजरा सालाबादप्रमाणे करण्यात येत असतो,
या गावांमध्ये प्राचीन काळा मध्ये कलाल समाजात भूजोरिया ला दैवत मानत आहे प्राचीन काळामध्ये एक मुलगी भावाकडे गेली असता तिच्या घरामध्ये तिची प्रकृती ठीक राहत नसेल मग भावाने एक संकल्प केला की माझी बहिणीची प्रकृती ठीक झाल्यास मी गावांमधून भुजोरिया उत्सव थाटामाटात वाजत गाजत मिरवणूक काढणार तीच रूढी परंपरा कायम ठेवत समाजाची अकोपा एकजूट युवक संघटना वाढीस लागावी या दृष्टीने समाजाचे आयोजन करण्यात येत असते ,
समाजातील महिला व पुरुष या उत्सवामध्ये सामील होत असतात या सणांमध्ये १० दिवस अगोदर धान पेरल्या जातात १० दिवसानंतर रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी रुढीपरंपरेनुसार भुजोरियाचा घट मांडण्यात येतो व गटाची पूजा करून ते धनाची टोपले महिला व मुली डोक्यावर घेतात व नंतर ढोल ताशे टाळ मु मृदुंगाच्या गजरात या गावप्रदक्षिणा रॅलीमध्ये संगीतमय वाद्य बँड पथक घेऊन सर्व गावातून मिरवणूक काढत चौका चौकामध्ये रॅलीच्या माध्यमातून पथनाट्य नृत्य करत कलाल समाजाचा संदेश देत मोठ्या थाटामाटात रॅलीचे आयोजन केले, विसर्जन आठवडी बाजारातील महादेवाच्या मंदिराजवळ करण्यात आले त्यानंतर दसऱ्याप्रमाणे समाजातील पुरुष महिलांनी परंपरेच्या नुसार समाजातील प्रत्येक घरोघरी जाऊन हातात देऊन एकमेकांना शुभेच्छा दिला हा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडावा त्यासाठी समाजातील सर्वांनीच पुढाकार घेत असतात, या कार्यक्रमाचे आयोजन सर्व कलाल समाज पुरुष नागरिक व महिला चे सालाबाद प्रमाणे आयोजन करत असतात,