राम नगरात रंगला कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा
नाट्यातून साकरला शिव कृष्ण दर्शन सोहळा
महिलांनी एकत्रित येत सोहळा केला रंगतदार
राम नगर येथील महिलांनी सामुहिकपणे कृष्ण जन्माष्टमी निमित्त नाट्यातून शिव कृष्ण दर्शन सोहळा साकारला. या सोहळ्यातील वेशभुषा या पौराणिक काळातील होत्या. त्याच बरोबर सर्वांना या सोहळ्यात सहभागी करण्यात आले होते.
रामनगर येथील तृप्ती संतोष हेडा यांच्या घरी नंद उत्सव साजरा केला गेला. या नंद उत्सवात शिव कृष्ण दर्शनाचा अर्थात जोगीलीलेचे नाट्य सादर करण्यात आले. यात प्रमुख असा भगवान शिव यांची भूमिका ही तुप्ती हेडा यांनी केली. माता यशोदा ची भूमिका खुशबू गर्ग यांनी केली. नंद बाबा ची भूमिका श्वेता गर्ग यांनी साकारली. नारायण की भुमिका कृष्णा हेडा यांनी केली. ग्वाला और मार्तेंड ऋषी यांची भूमिका ही पुनम अग्रवाल यांनी तर ग्वालाचा भूमिका ज्योती अग्रवाल, कृष्णाची भूमिका ही रजेश पटेल, बलराम यांची भूमिका ही भुवी गर्ग, तर मैत्रिणींची भुमिका ही स्मिता अग्रवाल, माया राठी, प्रेरणा मित्तल, सिला राठी, लिना मणियार, रेखा चाँडक, संध्या भट्टड यांनी केली. जन्माष्टमी च्या कार्यक्रमात सर्वांनी सामुहिकपणे सहभाग नोंदवित हा कार्यक्रम यशस्वी केला आहे.