मेष -बरेच दिवस राहून गेलेली गोष्ट वाचनात येईल. खर्च बेताचा ठेवावा. कामात अधिक चिकाटी ठेवावी लागेल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. हाती आलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ – समजून-उमजून गुंतवणूक करावी. चांगले साहित्य वाचनातून आनंद मिळेल. मन प्रसन्न राहील. जुने विचार बाजूला सारावे लागतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मिथुन – गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. हातातील अधिकार लक्षात घेऊन वागावे. जुनी येणी वसूल होतील. मित्रांची भेट घेणे शक्य होईल. अनामिक भीती दूर सारावी.
कर्क – जोडीदाराशी सहमत राहावे लागेल. आरोग्याची पथ्ये पाळावीत. खोटेपणाचा आधार घेऊ नका. जबाबदारी टाळून चालणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेदाची शक्यता.
सिंह – आत्मविश्वास कायम ठेवावा. नोकरीतील जुनी कामे मार्गी लागतील. कामातून समाधान शोधाल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. गोड बोलून मने जिंकून घ्याल.
कन्या – उत्तम गृहसौख्य लाभेल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. झोपेची तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी. व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा.
तूळ – घरातील कामात दिवस जाईल. महत्त्वाची कामे प्रलंबित पडू शकतात. जोडीदाराची इच्छा पूर्ण करावी लागेल. थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता. मित्रमंडळींशी संवाद साधावा.
वृश्चिक – उत्साह कायम ठेवावा. मनात बरेच दिवसांपासून घोळत असलेली इच्छा आमलात आणाल. अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
धनू – आपले व्यक्तिमत्व जपण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. वेगळा विचार करून पाहावा. व्यापारी वर्गाला दर्जा सुधारता येईल. ज्येष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
मकर – तुमचे मनोबल उंचावेल. जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका. उतावीळपणा करून चालणार नाही. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. मनातील इच्छा साकारता येईल.
कुंभ – उत्कृष्ट कलेचा अनुभव घ्याल. उतावीळपणाने वागून चालणार नाही. मन काहीसे चंचल राहील. प्रेमसंबंध सुधारतील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.
मीन – उत्साह व धडाडी योग्य कारणासाठी वापरा. चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. सौम्य शब्दांचा वापर करावा. घरात टापटीप ठेवाल.