
भजन किर्तन करत गोगा नवमी उत्साह साजरी
समाजातील सर्व सदस्यांनी एकत्र साजरी केली
विजय नगर येथील वाल्मिकी समाजातर्पेâ गोगानवमी निमित्त आकर्षक असा देखावा तयार करत त्या आधारे गोगानवमी मोठ्या उत्साहात साजरी केली. या वेळी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करत गोगानवमी ला गोगादेव यांचा जन्मसोहळा पार पडला.
श्रावणी पौर्णिमेला प्रारंभ झाल्यानंतर नवव्या दिवशी गोगा नवमी साजरी केली जाते. गोगा नवमी आणि त्याचे पूजन विधिवत केले जाते. गोगानवमी निमित्त विविध झाँकी, छडी, ताज काढण्यात आली. वाजत गाजत मिरवणूकीत भक्तांनी जल्लोष केला. या गोगा नवमी निमित्त वाल्मिकी समाजाने एकत्र येत ही नवमी साजरी केली. विजय नगर येथून गणेश घाटावर ही पालखी मोठ्या उत्साहात निघाली. त्याच बरोबर एक हजार पाण्याच्या बॉटलच्या माध्यमातून छडी तसेच ताज तयार करण्यात आला. या सर्व उपक्रमात जीत भगाजी चंडाले, गोविंदा खरारे, रणजित गोंडाले, प्रकाश चंडाले, वस्तादजी, सुरज कलाने यांच्यासह अनेक कार्यकत्र्यांनी गोगानवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. महिलांचाही मोठा सहभाग या उत्सवात होता. ज्येष्ठ नागरीक, तरुणांनी देखील या गोगा नवमीच्या यात्रेत सहभागी होत जल्लोष केला. मोठ्या प्रमाणात गोगानवमी रोजी आतिषबाजी करण्यात आली.