लखनऊ, 22 ऑगस्ट : सामान्यपणे माणसांना दोन हात आणि दोन पाय असतात. पण सध्या अशा बाळाचा जन्म झाल आहे ज्याला दोन हात आहेत पण पाय मात्र तीन आहेत. उत्तर प्रदेशमधील दोन हात आणि तीन पायांच्या या बाळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या बाळाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत आहेत. या बाळाला निसर्गाचा चमत्कार मानलं जात आहे.
शामलीच्या भडी भरतपुरी गावात हे विचित्र बाळ जन्माला आलं आहे. 20 ऑगस्टला या बाळाचा जन्म झाला. घरात ही प्रसूती झाली. बाळाला पाहून त्याचं कुटुंबही हैराण झालं. इतर 2 पायांप्रमाणे बाळाचा तिसरा पायही पूर्णपणे सक्रिय आहे. कुटुंबाच्या मते, पाय सोडता हे बाळ इतर सामान्य मुलांप्रमाणेच आहे. त्याची हालचाल नॉर्मल आहे…
पण तरी बाळ पूर्णपणे ठिक आहे की नाही, त्याला काही समस्या उद्भवू नये म्हणून करनालमधील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. डॉक्टरांच्या मते, बाळ पूर्णपणे स्वस्थ आहे. त्याच्या अल्ट्रासाऊंडमध्ये कोणतीच समस्या समोर आली नाही. त्याची आईही पूर्णपणे निरोगी आहे.