सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. येथे आपल्याला कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट, फूड इत्यादी अनेक विषयीचे VIDEO सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जे आपल्याला माहिती पुरवण्यासोबतच आपलं मनोरंजन देखील करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.
खरं तर सोशल मीडियवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काहीही करण्याची तयारी दाखवतात आणि असंच काहीसं आपल्याला या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.एक तरुणी म्हशीसमोर उभी राहून डान्स करत आहे. जे या म्हशीला जराही आवडलेलं नाही, ज्यामुळे म्हैस या तरुणीसोबत विचित्र गोष्ट करते.
ही तरुणी म्हशीकडे जाते आणि तिला खाण्यासाठी काहीतरी देते. परंतु त्यानंतर ती अचानक नाचू लागते. जे म्हशीला जराही आवडत नाही आणि ती या तरुणीकडे जोरात धावत येते आणि तिला धडक देते.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हिंदी मधली ”आ भैंस मुझे मार….” ही म्हण नक्कीच आठवेल, या तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे.
https://www.instagram.com/p/CflHTx0DY9U/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again