अकोला : शिक्षकी क्षेत्राला काळिमा फासणारे टी ई टी घोटाळा प्रकरण आता चांगलेच जोर धरत आहे. आता, शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र आढळून आलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पात्र नसताना पैसे घेऊन पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळवलेल्या आणि शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सात शिक्षकांचे वेतन थांबवण्यात येणार आहे. टीईटी भ्रष्ट प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांत पाचवी ते आठवीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय घेतला होता. शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र घाेषित केलेल्या शालार्थ अायडी गाेठवलेल्या उमेदारांची यादी तयार झाली अाहेत. जिल्ह्यातील सात जण असून, हे शिक्षक अकाेला, अकाेट, बार्शीटाकळी, तेल्हारा तालुक्यातील शाळांमध्ये कार्यरत आहेत.संचालकांच्या आदेशाचे पालन: टीईटीतील गैरव्यवहार व त्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक यांना आदेश पाठवला हाेता. अपात्र उमेदवारांचे शालार्थ आयडी गाेठवण्यात आले असून, त्यांंना अाॅगस्ट २०२२ पासून अाॅनलाइन अथवा अाॅफलाइन वेतन अदा हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे अादेशात नमूद केले हाेते. त्यानुसार अाता िशक्षणाधिकारी कार्यालय व वेतन पथक अधीक्षक कार्यालयाने अंमलबजावणीला प्रारंभ केला अाहे.