
रोशनी वानखडे असे मृत युवतीचे नाव
नोकरीच्या तयारी करताना झाला मृत्यू
पोलिस दलात नोकरीच्या अपेक्षेने धावणाNया रोशनी वानखडे हिचा आज वसंत देसाई क्रींडागणावर मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. ती आगर नजीकच्या गावाजवळची असल्याची माहिती मिळाली आहे.
वसंत देसाई व्रिंâडागणावर रनिंग आणि व्यायामासाठी येणाNया रोशनी वानखडे हिचा धावताना अचानक कोसळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ती केवळ बावीस वर्षांची होती. ती येथील आगर गावानजीक राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिस दलात नोकरीसाठी फिजिकल ची तयारी तिची सुरु होती. ही तयारी करताना, धावताना तिला हार्ट अॅटक आला आणि तिचा त्यात मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, तिला लगेच सर्वोपचार मध्ये नेल्या गेले. पण, तिथे डॉक्टरांना तिला मृत घोषित केले.