अपघातात दोघे झाले जखमी

अकोला


अकोला व बुलढाण्याचा एक युवक
अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र


बाळापूर रोडवर आज झालेल्या अपघातात अकोल्याचे एक तर बुलढाणाचा एक तरुण जखमी झाला आहे. हा अपघात दूपारी झाला. अपघातात जखमींना येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.


अकोला शहरातील बाळापूर रोड वर असलेल्या बिझनेस सेंटर जवळ भीषण अपघात झाला, यात मोटरसायकलवरील दोघे जण ज्यात राम नगरयेथील एकवीस वर्षीय अनिकेत पाटील तसेच बुलढाणा येथील इंदिरा नगर येथील रहिवासी २१ वर्षीय निखिल पालवे जखमी झाले आहे. या दोघा गंभीर जखमीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यांचा अपघात नमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी लोकांनी लगेच मदत केल्याने त्यांना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *