प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त
देखभाल दुरुस्ती अभावी प्रवाशांचे हाल
राज्य शासनाच्या परिवहन मंडळाच्या बसेस ची दुरावस्था झाली असून प्रशासन सध्या दुरावस्था कडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. ग्रामीण असो का शहरी रस्त्यांची काळजी न करता धावणाNया एस टी बसेसचे टायर खराब झाल्याचे चित्र आहे.
ग्रामीण असो का शहरी सर्वत्र आपली सेवा देणारी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस ची सध्या दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे . ग्रामीण भागातील खडतर रस्त्यांना आपल्या चाकाच्या खाली तुडवून प्रवाश्यांना सेवा देणाNया एस टी बसेस कडे प्रशासन दूर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी काही बसेस ची टायर पुâटण्याच्या स्थितीत आले आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक आगारचा बसेस देखरेख आणि दुरुस्ती गरजेची आहे .पण एस टी बस कर्मचाNयांच्या संपा नंतर या देख रेख आणि दुरुस्ती कडे गांभीर्याने बघितले जात नाही आहे .या मुळे एस टी बस चालकांना अनेक ठिकाणी आलेल्या समस्याना तोड द्यावं लागतं आहे . अनेक एस टी बसेसची टायरे बदलण्याची गरज आहे. परिवहन मंडळ प्रशासनाने याबाबीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.