जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा टू व्हिलरवर दौरा…..

अकोला

आलेगावचे तलाठी किशोर सोळंके अडचणीत
जिल्हाधिकारी निमा अरोरांच्या स्थळ पाहणी
चारचाकी गाडी जात नव्हती तर टू व्हिलर दौरा


जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना आलेगाव येथील शिवटेकडीवर अवैध उत्खनन आढळले. या ठिकाणी जाण्यासाठी चारचाकी गाडी जात नव्हती अखेर जिल्हाधिकारी यांनी अतिशय खडतर मार्गावरहा दूचाकीवर दौरा पुर्ण केला.


जिल्हाधिकारी निमा अरोरा या अतिशय खडतर मार्गाने नेमक्या कुठे चालल्या असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण, जिल्हाधिकारी यांची चारचाकी गाडी जिथे पोहचू शकत नव्हती. तिथे थेट दूचाकीवर शासकीय दौरा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केला. या दौNयात त्यांनी शासकीय इ क्लास जमीनीवर अतिक्रमण तसेच आलेगाव येथील शिव टेकडीवरचे अवैध उत्खनन निदर्शनास आणून दिले. स्थळ पाहणी करताना त्याच्या प्रश्नांना तलाठी समर्पक उत्तरे देऊ शकले नाही. त्यामुळे तलाठी यांना दोन दिवसात उत्तर देण्याचा आदेश पातूर तहसीलदारांनी दिला आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी स्वतः स्थळ पाहणी केली. या स्थळ पाहणीत शिव टेकडी येथून बेकायदेशीर पणे मुरुम उत्खनन झाल्याचे उघड झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी यांनी तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावविण्याचे आदेश पातूर तहसीलदार यांना दिले आहे. अवैध उत्खनन संपुर्ण जिल्ह्यात सुरु असून त्या त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकाNयांनी वंâबर कसली आहे. त्याच बरोबर ई क्लास जमीनीवरचे अतिक्रमण साफ करण्यासाठी जिल्हाधिकारी या अग्रेसर आहे. या अवैध उत्खनन बाबत खनिकर्म विभागाचे देखील दूर्लक्ष असल्याचे चित्र होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *