- सर्वत्र परिसरातीलशेतकरी हवालदील
- शेतकऱ्याची तहसील कार्यालयावर धाव
अकोट: अकोट तालुक्यातील संन्त्रा चा मृग आणि आंबिया बहार ला वातावरणातील बदलामुळे गळती लागल्यामुळे उमरा, अकोलखेड,पणज या मंडळातील संत्रा बागायतदार शेतकरी यांना आर्थिक मदत हेक्टरी 2 लक्ष रुपये आर्थिक मदत मिळावी या करीता उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट व जिल्हाधिकारी कार्यालयात अकोला यांना शिवसेना उमरा सर्कल संघटक ऋषिकेश लोणकर यांच्या वतीने ने निवेदन देण्यात आले. गेल्या तिन वर्षा पासून वातावरणातील बदलामुळे पाऊस वेळेवर न आल्यामुळे मृग बहार येत नसुन यावर्षी अल्पशा प्रमाणात आलेला आहे यावर्षी जुन महिन्यात योग्य पाऊस न झाल्यामुळे मृग बहार अल्पशा प्रमाणात उशिरा आला आहे मृग बहार ला पोषक वातावरण न मिळाल्यामुळे मृग बहार ला गळती लागलेली आहे तरी त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून शेतकर्यांची चिंता वाढली आहे तसेच सायला या रोगामुळे आंबिया बहाराचे संत्र सुध्दा गळुन पडले आहे वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला,आपल्या स्तरावरून लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे जर आमच्या या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही तर आम्हाला पुढिल निवेदन हे कृषी अधिकारी यांना व वरीष्ठ पातळीवर द्यावे लागेल व सदर प्रकरणात न्याय मिळाला नाही तर शिवसेना पध्दतीन तिव्र आंदोलन करण्याचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागेल
तरी अकोलखेड व उमरा.पणज. मंडळातील शेतकर्यांना मोठी आर्थिक मदत मिळणे अपेक्षित आहे तरी सादर निवेदन…..प्रति मा.उपविभागीय अधिकारी साहेब अकोट यांना देण्यात आले-पणज महसुल मंडळातील बागायतदार बागायतदारदरवर्षी प्रमाणे याही वर्षी सतत होणार्या अतिवृष्टीमुळे संञा,केळी या बागायतदार व इतर पिकांच्या शेतकर्यांच अतिवृष्टी मुळे अतोनात आर्थिक नुकसान झालेल असुन आणन शासन दरबारी याची दखल नोंदवुन तात्काळ पणज महसुल मंडळामध्ये ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना मानसिक व आर्थिक आधार द्याल हीच अपेक्षा शेतकर्यांना केली हेक्टरी 2 लक्ष रु आर्थिक मदत मिळावी हि मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, ता. प्रमुख शाम गावंडे उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर ढोले आदिवासी ता प्रमुख सुभाष सुरत्ने , राजेश भालतिलक ,योगेश सुरत्ने ,संघटक ऋषिकेश लोणकर प्रशांत येऊल साहेबराव भगत, संजय गयधर, अनिल जयस्वाल ,अनिल ताडे गजानन मेतकर ,रमेश खिरकर देवानंद खिरकर ,नंदकिशोर बोंद्रे, वीपिन गडगोळे ,गजानन लाहोरे , निलेश गोळमकार ,सागर भालतिलक, शशिकांत गयधर विकास ठाकरे निलेश लोणकर ,पांडुरंग सोनोने, बाबाराव सोनोने ,सुभाष धर्माळे, भानुदास भोसले, सुभाष तोटे, राधेश्याम जामुनकर ,अंभिर मोरे सुभाष मोहिते , मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते