दूकानदारांचे नाव पोलिसांनी ठेवले गोपनीय
वाहनचालकावर केली कारवाई मुख्य सुत्रधार कोण
स्वस्त धान्य बाजारातील तांदूळ काळ्या बाजारात जात असताना अकोला पोलिसांनी कारवाई करत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, हा साठा कुणाला दिला गेला होता व कोणी तो विकला याची देखील चौकशी होण्याची गरज आहे.
गुप्तमाहितीच्या आधारे मालवाहू तीनचाकी वाहनात बाळापूर कडुन अकोल्याला शासकीय अनुदानित धान्य जास्त दरात विक्री करिता नेत असल्याची माहिती मिळाली. या वाहनाची तपासणी केली असता वाहनचालक बाळापूर येथील तेलीपूराचा रहविासी आशिष भगवान घनमोडे याने तांदूळ, गहू असा दीड लाखांचा मुद्देमाल असल्याचे सांगितले. या धान्याबाबत विचारले असता त्याने संबधित धान्य हे खेडे गावातून कमी दराने विकत घेऊन जास्त दरात विकण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. जीवनाश्यक कायद्यांतर्गत हे गैरकृत्य असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.