क्रिकेट क्लब मैदानावर चिखलच चिखल

अकोला


गणपती मुर्तींची विक्री करणार तरी कशी
महापालिकेने केली नाही कुठलिच सोय


आज अचानक आलेल्या पावसाने गणेश भक्तांबरोबर, सार्वजनिक मंडळ व गणेश मुर्तीकार यांची मोठी अडचण झाली होती. तर, गणेश मुर्ती विक्री वेंâद्रावर सर्वत्र चिखलंच चिखल झाल्याचे चित्र होते.


आज दूपारी अचानक आलेल्या पावसाने गणेश मुर्तीकार व विव्रेâते यांची मोठी अडचण झाली आहे. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर असलेल्या गणेश मुर्ती विक्रीच्या तात्पुरत्या ठिकाणी महापालिकेने कुठलिच सोय केली नाही. या ठिकाणी महापालिकेने सोय करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. त्यामुळे चिखलात विव्रेâते आता गणेश मुर्ती विक्रीसाठी बसले असून ग्राहकांना हा चिखल तुडवित गणेश मुर्ती विकत घ्यावी लागेल. गणेशोत्सवासाठी शहरात तयार होत असलेल्या मंडपांना देखील या पावसाने चांगलाच फटका दिला. काही मंडप उघड्यावर असून ते चांगलेच ओले झाले आहे. तर काही मंडळांचा मंडप, डेकोरेशन अंतिम टप्प्यात असताना पावसाने सर्व केलेल्या कामावर पाणी पेâरले आहे. आजच्या पावसाने नागरीकांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र होते. गणेशाच्या आगमनापुर्वी झालेल्या या पावसाने भाविक, विव्रेâते व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची चांगलीच अडचण आज झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *