शेतक-यांना दिलासा,पिकांना संजीवनी

अकोला

पावसाची पुन्हा एकदा हजेरी
गणेशाच्या आगमनापुर्वी वरुण राजाचे आगमन


अकोला शहरात १५ दिवसांच्या विश्रांती नंतर आज दुपारच्या सुमारस पावसाने अर्धा तास दमदार हजेरी लावली. गणेशाच्या आगमना पूर्वी आलेल्या या पावसाने मंडळातील कार्यकत्र्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. दरम्यान, शेतातील पिकांना या पावसाने संजीवनी मिळाली आहे.


सलग १५ दिवसा दडी मारुन बसलेल्या पावसाने आज दुपाराच्या सुमारास हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरात चांगलीच धावपळ झाली. हरतालिका सामना, बेल पुâल व फळ घेऊन बसलेल्या ग्रामीण भागातील छोट्या दूकानदारांना याचा फटका बसला. शहरातील जठारपेठ, खुले नाट्य गृह या भागात बसलेल्या छोट्या व्यावसायिकांवर पाऊस कोसळला. काहींजवळ प्लॅस्टिक असल्याने त्यांचा माल बचावला. या पावसाने शहरातील रस्त्यांवरची उडणारी धुळ मात्र आता थांबेल. त्याच बरोबर पावसाच्या पाण्याने रस्ते स्वच्छ झाल्याचे चित्र होते. ग्रामीण भागात शेतकNयांना मात्र या पावसाने सुगीचे दिवस आल्याचे चित्र होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *