मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी’, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी स्वत: युक्तीवाद केला.
चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख हे तुरूंगात चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतल्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याचीही माहिती समोर आली होती. खासगी रुग्णालयात उपचार आपल्याला उपचारासाठी परवानगी द्यावी अशी मागणी अनिल देशमुख करत आहेत.
दरम्यान, चक्कर येऊन पडल्यानंतर अनिल देशमुखांवर मुंबईतल्या जे जे रुग्णालयात प्राथामिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टात युक्तीवाद केला. विशेष बाब म्हणजे स्वत: अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात आपली कैफियत मांडली.