दिलजीत दोसांजच्या ‘जोगी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; सत्य घटनेवर…

Entertainment

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज एक घटना प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या दंगलीच्या घटनेवर आधारित चित्रपट ‘जोगी’ चा पहिला ट्रेलर मुंबईत ‘फिल्म्स डे’ ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर याने केले असून, अलीने यापूर्वी सलमान खानच्या ब्लॉकबस्टर ‘सुलतान’चे दिग्दर्शन केले आहे.एका कार्यक्रमादरम्यान दिलजीत दोसांज म्हणाला, “अभिनेता म्हणून तुम्ही साकारत असलेल्या व्यक्तिरेखेमुळे तुमची व्यक्ती म्हणूनही प्रगती होत असते. मी साकारलेली प्रत्येक भूमिका मला व्यक्ती म्हणून विकसित होण्यास मदत करते’.जोगी’ हा चित्रपट १९८४ मध्ये दिल्लीतील प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने एकत्र असलेल्या मित्रांवर आधारित आहे. हा चित्रपट तीन मित्रांच्या लढाऊ भावनेचा एक रोमांचक आणि भावनिक प्रवास आहे. ‘तांडव’ आणि ‘ब्लडी ब्रदर्स’ या अॅमेझॅान प्राइम व्हिडीओमधील प्रसिद्ध कलाकार मोहम्मद झीशान अय्युब देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, या चित्रपटात कुमुद मिश्रा, हितेन तेजवानी आणि अमायरा दस्तूर हे कलाकारही महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर निर्मित ‘जोगी’ हा चित्रपट १६ सप्टेंबर २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *