मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला, तोंडात बोळा कोंबून, दुचाकीवर टाकून दोघांनी पळविले. त्यानंतर महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये, एकाने तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या गेवराई शहरामध्ये घडली.पोलीस (police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एका छोट्याशा गावात, पीडित मुलीचे वडील शेतात सालगडी म्हणून काम करतात. यादरम्यान काल पीडिता आणि तिची बहिण गेवराई शहर शहरातील तिच्या चुलत्यांकडे आली होती. यावेळी चुलतीने सन उत्सवानिमित्त दोघी बहिणींना नवीन कपडे घेण्यासाठी मार्केटमध्ये नेले.
कपडे घेऊन झाल्यावर, पीडितेची चुलती एक वस्तू आणण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेली. याचाच गैरफायदा घेऊन, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी, पीडितेच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून तिला दुचाकीवर बसवलं. त्यानंतर सुसाट वेगाने दुचाकी गेवराई पासून बीडच्या दिशेने नेली.