विनायक चतुर्थीला बनवा गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक !

Trending NEWS

गणपती बाप्पा मोरया ! हा आवाज अवघ्या काही काळानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात गुणगुणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे.

गणपतीच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील परंतु, त्यासाठी गणपतीला (Ganpati) खूश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव बाप्पाला खुश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा आवडीचा पदार्थ ‘मोदक’.गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे मग ते माव्याचे असोत किंवा उकडीचे. उकडीचे मोदक हे साधारणपणे हे तांदळापासून बनवले जातात. परंतु, आज आपण गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक बनवणार आहोत. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जाणून घेऊया त्याची रेसिपी.साहित्य –

सारणासाठी

ओल्या नारळाचा किस – १ कप

गूळ – १ १/४ कप

भाजलेली खसखस – १ मोठा चमचा

सुकामेवा, वेलचीपूड – आवश्यकतेनुसारपारीसाठी

गव्हाचे पीठ – १ कप

तांदूळ पिठी – १ मोठा चमचा

तूप – १ चमचा

दूध – १/२ कप

मीठ

कृती -१. पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करुन त्यात खोवलेला नारळ घालून चांगला परतवून घ्या. यात पाऊण कप गूळ घालून मिश्रण चांगले एकजीव करा.२. मध्यम आचेवर सारण एकसारखे हलवत रहा. यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स व खसखस आणि वेलची पूड घालावी. सर्व साहित्य एकसारखे मिक्स करुन घ्या. सारण अधिक कोरडे करु नका. त्यातील जास्तीचे पाणी आटल्यानंतर गॅस बंद करावा.

३. पारी बनवण्यासाठी आपण गव्हाचे पीठ व चमचाभर तांदळाची पिठी घालावी. तसेच चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करुन घ्या. वरुन १ चमचा तूप घाला, ज्यामुळे पारी खुसखुशीत होईल.४. पारीच्या पिठात दूध (Milk) घालून चांगले मिक्स करुन घ्या व पीठ मळून घ्या. कणीक चांगले भिजल्यानंतर त्याचे गोळे बनवून घ्या. दोन्ही बाजूला पीठ लावून पुरीसारखे लाटून घ्या.

५. मोदकाच्या चाळणीला मोदक चिकटू नये म्हणून तूप लावा. तयार पारीत १ चमचा सारण भरून चिमटीत दाबून कळ्या तयार करा. कळ्या जोडल्यानंतर त्याला मोदकाचा आकार द्या व १५ मिनिटे वाफवून घ्या. ५ मिनिटांनंतर मोदक काढा.

६. तयार मोदकावर तूप घालून गरमा गरम सर्व्ह करा कणकेच्या पिठापासून उकडीचे मोदक !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *