सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं (Viral Video) व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेकदा हिरो बनण्याच्या नांदात फजिती होणाऱ्या व्यक्तींचेही बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओ सदरील व्यक्ती हा एका बैलाची खोड काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र बैल त्याला असा धडा शिकवतो ज्याचा त्याने विचारही केला नसेल. बैलाला डिवचण्याचा प्रयत्न करत असलेल्या या व्यक्तीला बैल आपल्या पायाखाली चिरडतो. ब्रिटिश कॉमेडियन आणि अभिनेता रिकी गेर्वाईसने हा व्हिडिओ ट्विटरवर (Social Media) शेअर केला आहे. रिकी प्राणी हक्क कार्यकर्ता म्हणूनही ओळखला जातो.व्हायरल झालेल्या व्हिडीओत काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक व्यक्तील बैलाच्या शिंगाला हात लावून त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीच्या बाजूला बघ्यांची गर्दी आहे. हा बैलाशी संबधित कुठलातरी खेळ असावा असा अंदाज आहे. सुरूवातीला बैल या व्यक्तीने काढलेली खोड सहन करतो. मात्र, त्यानंतर बैलाला या व्यक्तीच्या कृत्याचा राग येतो. आपली खोड काढणाऱ्या या व्यक्तीला बैल अगोदर खाली पाडतो. त्यानंतर त्याच्या अंगावर पाय देऊन त्याला चिरडतो.