वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यात खाद्यतेलाच्या आणि भाजीपाल्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत त्यामुळे सर्वांच्या खिशावर ताण आला आहे. आता त्यात आणखी भर पडली आहे. जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तरल आजपासून तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.
देशांतर्गत विमानसेवेवर लावण्यात आलेली भाड्यावरील मर्यादा 31 ऑगस्ट म्हणजेच आजपासून हटवण्यात येणार आहे. कोरोना महामारीनंतर विमान प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर सरकारने विमान तिकिटांच्या किमतींमध्ये अनपेक्षित वाढ रोखण्यासाठी उड्डाणाच्या कालावधीनुसार तिकीट दरांवर किमान आणि कमाल फेअर बँड लागू केला होता. मात्र आता तो काढून टाकण्यात येतील असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. या बदलामुळे विमान कंपन्यांना त्यांचे भाडे निश्चित करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळण्याची अपेक्षा आहे.