एका उच्चशिक्षित हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी बळजबरीने विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात घडल्याची माहिती भाजप नेते व राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी दिली. तिचा विवाह (marriage) एका नववी पास झालेल्या मुस्लिम समाजातील मुलाशी लावण्यात आलं. घडलेल्या प्रकारावर पाेलीस प्रशासन पडदा टाकत असून हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आराेप बाेंडे यांनी माध्यमांशी बाेलताना केला.खासदार बाेेंडे म्हणाले अमरावती जिल्ह्यात नववी वर्गात शिकलेल्या एका मुस्लिम तरुणाने एका उच्चशिक्षित हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह केला. संबंधित मुलीची संमती नसताना हा विवाह लावून दिला गेला. या प्रकारामुळे तिला धक्का बसला आहे. ती सध्या रुग्णालयात दाखल आहे.आम्ही तिची भेट घेऊन तिला धीर दिला आहे असे बाेंडे यांनी नमूद केले. ते म्हणाले ज्या ठिकाणी हा विवाह झाला ती संस्था व वकील बोगस आहेत. तसेच मुस्लिम समुदायानं आपली पोरं सांभाळावीत. जबरदस्तीने लग्न लावून देत असतील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही असा इशाराही बाेंडेंनी दिली.
यावेळी बाेंडे यांनी हिंदू मुलींनी काेणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच तुमचं आयुष्य बरबाद करू नका असं आवाहन केले. या प्रकरणावर विश्वहिंदू परिषद, बजरंग दल आवाज उठविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान मुस्लिम समाजातील जाणत्या तसेच वरिष्ठांनी मुलांना समज द्यावी असेही बाेंडेंनी स्पष्ट केले.