मागील कार्यकाळात मद्यप्रेमीवर लावला होता अंकुश
अकोट :अकोट तालुक्यातील पुंडा नंदीग्राम येथे परत एक वर्षानंतर नंदकिशोर पंजाबराव कुलट यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांनी 2020-2021 मध्ये गावातील अवैध धंद्यांसह गावातून दारूही बंद केली होती.
परत आता एक वर्षानंतर 30 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत चक्क महिलांनी मोठ्या उपस्थितीती दर्शवित तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहभाग घेत अखेर नंदकिशोर कुलट यांना मोठ्या प्रमाणात मतदान करीत निवडून दिले.
या निवडीने परत मद्यप्रेमींच्या व अवैध दारू विक्रेत्यांमध्ये धास्ती भरली असल्याचे गावामध्ये बोलल्या जात आहे. नंदकिशोर कुलट यांनी 2020-2021 मध्ये चक्क पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्या विभागाआधी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या वृत्त प्रकाशित झाले आहेत.