
काँग्रेसचे विधीमंडळ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवरून खोचक टोला लगावला आहे. “आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले जे राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज ठाकरे यांची वाटचाल कशी चालली आहे हे आपण पाहत आलो आहोत. आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले जे राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत.”“२४ तासात भाजपाचे तीन मोठे नेते राज ठाकरेंना भेटले”
“गेल्या २४ तासात भाजपाचे तीन मोठे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे यातून भाजपासोबत युती होण्याचे काही संकेत मिळत आहेत,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका धर्माचे कसे होऊ शकतात?”
रामदेव बाबांच्या वक्तव्यावरही बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “रामदेव बाबा मुख्यमंत्र्यांना भेटूले बोलले की, एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे सर्वात मोठे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका धर्माचे कसे होऊ शकतात.”