सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही असा टाेला आमदार अमाेल मिटकरी (amol mitkari) यांनी शहाजी बापू पाटील यांना लगावला आहे. मिटकरी हे अकाेला येथे बाेलत हाेते.आमदार शहाजी पाटील यांनी अमोल मिटकरी यांचा संजय राऊत (sanjay raut) होणार असं वक्तव्य नुकतेच केले हाेते. अमोल मिटकरींनी आमदार शहाजी पाटलांच्या वक्तव्यास प्रत्युत्तर देत ते सध्याच्या सरकारममधील करमणुकीचं पात्र आहे असे म्हटलं आहे.अमाेल मिटकरी म्हणाले शिंदे गटाचे ते जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. ‘माझी’ काळजी न घेता, शिंदे गटात त्यांची कशी पायखेचनी सुरु आहे. याची काळजी घ्यावी असंही मिटकरींनी नमूद केले.
मिटकरी म्हणाले शिंदे गटात कितीही डायलॉग बाजी केली तर तुम्हांला कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री हे पद देखील भेटणार नाही. त्यांची ही शेवटीचं टर्म राहील असेही मिटकरींनी नमूद केले.
राज ठाकरेंना टाेला
दरम्यान गणपती स्थापनेवरूनही मिटकरींनी आज राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. अनेक लोक अमोल मिटकरी यांना नास्तिक म्हणतात या संदर्भात बोलले आहेत. काही लोक आजही दीड दिवसाचा गणपती बसवतात, मात्र मी पूर्णपणे दहा दिवसाचा गणपती बसवतोय असा टाेला मिटकरींनी ठाकरेंना हाणला.