मूर्तीजापुर : भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मुर्तिजापूर येथे बायोस्टॅंड इंडीया लिमिटेड मुंबई यांचे कडून बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती चे वितरण करण्यात आले. शेतकरी कुटुंबातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती योजने अंतर्गत प्रत्येकी रु २५००/- प्रमाणे एकुण १०विद्यार्थ्यांना रु २५००० शिष्यवृत्ती देण्यात आली. सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रगती प्रमाण पत्र देउन सन्मान कऱण्यात आला. या वेळी बायोझाईम दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचे सुरक्षा किट देउन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कंपनीचे रिजनल बिझनेस मॅनेजर श्री निलेश हागे सिद्धी तांबे मॅडम भारतीय शिक्षा मंडळाचे श्री संतोषजी पाठक भारतीय ज्ञानपीठ प्राचार्या नीता इंगळे मॅडम श्री दिनेश गावंडे (क्षेत्रीय व्यसस्थापक) श्री अतुल इंगळे (संचालक महालक्ष्मी ऍग्रो )यांची प्रमुख उपस्थिती होती.तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी विध्यार्थी पालक वर्ग यांची आवर्जुन उपस्तिथी होती. भारतीय ज्ञानपीठ कर्मचारी वृंद व श्री गौरव पावडे भूषण परोडकर योगेश गावंडे सौरभ शेंगोकर अक्षय दहिकर यांचे विशेष सहकार्य लाभले.