कमी गुण दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकालाच झाडाला बांधून केली मारहाण! शिक्षक म्हणतात, “त्यांनी आम्हाला…!”

Trending NEWS

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी काही चूक केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात ही बाब सर्वसामान्य झाली आहे. यासंदर्भात काही ठिकाणी विरोध केला जात असला, तरी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी हे आवश्यकच असल्याचं मानणारा देखील पालकांमधला एक गट आहे. मात्र, शिक्षकानं चूक केली असं वाटून त्यांनाच झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा एक अजब प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. झारखंडच्या डुमका जिल्ह्यात ही घटना घडली असून यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. मात्र, त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे शाळेकडून यावर तक्रारच दाखल करण्यात आली नसल्यामुळे पोलिसांनीही कोणती कारवाई केलेली नाही.नेमकं घडलं काय?
हा सगळा प्रकार सोमवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. डुमका जिल्ह्याच्या गोपीकंदर भागात असलेल्या एका निवासी शाळेतील मुलं अचानक आक्रमक झाली. नुकताच त्यांचा परीक्षेचा निकाल लागला होता. मात्र, यामध्ये आम्हाला कमी मार्क देण्यात आल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. शाळेतील नववीच्या वर्गातल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ११ विद्यार्थ्यांना दुहेरी ड श्रेणी देण्यात आली होती. ही श्रेणी म्हणजे दुसऱ्या शब्दांत नापासचाच शेरा मानला जातो. शिक्षकांनी प्रात्याक्षिकांचे गुण अतिशय कमी दिल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून केला जात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *