आपच्या महिला आमदाराला सर्वांसमोर कानशिलात लगावली, सोशल मीडियावर

Maharashtra State

कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे तुम्ही पाहिली असतील. याला राजकारणारत वावरणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वाटेलाही असे प्रसंग येत असतात. याचं ताजं उदाहरण देणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आपच्या एका महिला आमदाराला तिच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात लगावली आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत असते, त्यांच्यासाठी धोरणं आखत असते. पण सरकारमधल्याच एका महिला आमदारसोबत कौटुंबिक हिंसाचार झालेला समोर आलाय. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पंजाबमधला आहे. इथल्या आम आदमी पक्षाच्या महिला आमदार बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने रागाच्या भरात सर्वांसमोर कानशिलात लगावलेली दिसत आहे. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांच्या पतीला असं करण्यापासून रोखलं. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ १० जुलैचा आहे. ५० सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. आमदारावर पतीने केलेल्या मारहाणीची संपूर्ण घटना त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेबाबत बलजिंदर कौर आणि त्यांच्या पतीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार असलेल्या पत्नीवर हात उगारलेल्या पतीवर सर्वत्र टीका होत आहे. बलजिंदर कौर या भटिंडाच्या विधानसभा मतदारसंघातील तलवंडी साबो येथून आम आदमी पक्षाच्या आमदार आहेत. त्यांच्या कुटुंबात काही कारणावरून वाद सुरू होता आणि त्यातूनच हा सगळा वाद झाला. मात्र, या घटनेमागचे खरे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *