नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तब्बल ६ तास चौकशी

Entertainment

सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडून २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरु आहे. याप्रकरणी ईडीकडून ७००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यावधी रुपये खर्च केले होते. त्यात अभिनेत्री नोरा फतेहीचेही नाव समोर आलं होतं. नुकतंच सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोरा फतेहीची चौकशी केली. यानंतर आता येत्या १२ सप्टेंबरला जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली जाणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोरा फतेहीची तब्बल ६ तास चौकशी केली. यावेळी चौकशीदरम्यान तिला ५० प्रश्न विचारण्यात आले. यावेळी उत्तर देताना नोरा म्हणाली, मला सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल काहीही माहिती नाही. तसेच या प्रकरणातील आरोपी जॅकलिन फर्नांडिससोबत माझा कोणताही संबंध नाही.तिला सुकेशकडून कोणती भेटवस्तू मिळाली, ती त्याच्यासोबत कशाप्रकारे बोलायची, ती त्याला कुठे भेटली, यासंह अनेक प्रश्नांचा भडिमार यावेळी नोरावर करण्यात आला. यावर तिने स्पष्ट शब्दात उत्तर दिली. तसेच ती तपास करणाऱ्यांना सहकार्य करत असल्याचे बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *