सिटी न्यूज सुपरफास्ट गणेश उत्सव
अकोला:- धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड मिळाल्यास अनेक अवघड उद्देश साध्य करून घेता येतात माँ चंडिका युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव ( बाल गोपाल ) मंडळ याच प्रयत्नातून शिक्षण व्यसनमुक्ती साठी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे त्यांच्या प्रयत्नाने अनेक परिसरात शिक्षण व व्यसनमुक्तीसाठी महत्त्वाचा हातभार लागला आहे मंडळाची स्थापना जवळपास ६१ वर्षा अगोदरपासून अखंडित सुरू आहे कुरणखेड येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये जुन्या चावडी परिसरात या मंडळाची मूर्ती स्थापन केली जाते, वर्षभर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळातर्फे आयोजित करण्यात येतात, मंडळ तर्फे गावात सुसज्ज अभ्यासिका, व्यसनमुक्ती पासून दूर राहण्यासाठी नव तरुणांना जनजागृती, लहान वयातील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धा यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा मंडळातर्फे वितरित करण्यात येते, मंडळातर्फे तरुण वर्ग शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहावे यासाठी मंडळाची व्यायाम शाळा सुद्धा कार्यरत आहे
समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत मंडळाचे कार्यकर्ते समाज हिताचे व समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात यावर्षी मंडळातर्फे लालबागच्या राजाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे ढोल ताशांच्या गजरात 31 ऑगस्टला मूर्तीची स्थापना करण्यात आली विविध धार्मिक विधीवत पूजा अर्चना करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले होते मंडळातील सदस्य
गणेश उत्सव मंडळातील सदस्य माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक मधे कार्यरत आहेत याच मंडाळाचे अध्यक्ष योगेश विजयकर, उपाध्यक्ष शेखर भदे, योगेश उर्फ मंगेश पावडे, प्रज्वल कांबे, उज्वल कांबे, यांनी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांची मदत केली होती त्याबद्दल त्यांचा विविध संस्था संघटना राजकीय पक्षांतर्फे सत्कार सुद्धा करण्यात आला होता
आमच्या गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होते विविध धार्मिक व समाज उपयोगी कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे राबविण्यात येतात गेल्या अनेक वर्षांची परंपरा आम्ही अखंडितपणे सुरू ठेवत आहोत
अमर मालाणी
( ज्येष्ठ सदस्य )
मंडळातर्फे शिक्षण व व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आमच्या मंडळाचा सहभाग, नागरिकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्यासाठी आमचे मंडळ सदैव तत्पर आहे आमच्या मंडळामार्फत अपघातग्रस्तांना मदत, आपत्ती व्यवस्थापनात आमचे मंडळ अग्रसेन आहे यावर्षी सुद्धा मंडळा तर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आमच्या मंडळाची सेवा ही अखंडपणे सुरू राहणार आहे
योगेश विजयकर
( माँ चंडिका युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष )
अठरापगड जातींचा सहभाग असणारा मानाचा गणपती अमर मालाणी,विनोद आठवले,प्रकाश फाटे, घनश्याम उर्फ बंडू विजयकर, उदय देशमुख,मंगेश पावडे,शेखर हरसुलकर, वामन गायकवाड, कैलास चव्हाण, बबलू देशमुख, मंगेश मोरे, बाबु ढोकणे, योगेश विजयकर ,शेखर भदे, अमोल इंगळे, मुकेश हरसुलकर, गणेश धानोरकर, मयूर धानोरकर, गोपाल धानोरकर, आदित्य भेंडकर, रितेश भेंडकर, प्रथमेश भेंडकर, अनंता धनोरकर, राम देशमुख, निखिलेश विजयकर, तेजस विजयकर, विशाल विजयकर, आनंद कांबे, प्रज्वल कांबे,उज्वल कांबे, ऋषभ कांबे, प्रणित कांबे, हर्षल कोगदे, मयूर मोरे, सुरज मोरे, पवन जुमळे, राहुल मोरे, निलेश भोंडे, संतोष बरडे, ओम आठवले, आदित्य फाटे, यश आठवले, विजय दहिकार, अंगद दहीकार, चंद्रकांत भुजबळ, प्रथम बरडे, स्वप्निल चीम, हरीश धानोरकर, राहुल धानोरकर, तुषार अंजनकर, यश गावंडे, ओम ढोकणे, शुभम वानखडे, प्रवीण सोनोने, अमोल धानोरकर, वसंता धानोरकर, राज गुल्हाणे,ओम कुपटकर या सर्व युवा पदाधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे