संताजी सेनेची उपविभागीय अधिकारी यांना मागणी
प्रतिनिधी/अकोला
आमदार संतोष बांगर यांनी आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केल्याबाबत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी संताजी सेना मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदनातून केली आहे.
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी 30 ऑगस्ट रोजी डॉ.नितीन अंबाडेकर यांना दूरध्वनीवरून फोन लावला.डॉ. नितीन अंबाडेकर आरोग्य विभागाच्या महत्वाच्या बैठकीत असल्याने फोन उचलून शकले नाहीत.बैठक संपताच डॉ.नितीन अंबाडेकर यांनी आमदार संतोष बांगर यांनी राज्यात 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा प्रश्न मांडला.व रुग्णवाहिकाचालक यांना वेतन मिळत नसल्याने ते संपावर आहेत,याबाबत विचारणा केली.परंतु,फोनवर बोलत असताना आमदार संतोष बांगर यांनी एक लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिभेस तडा जाईल,पदाच्या गरिमेला धक्का पोहचेल,असे डॉ.नितीन अंबाडेकर यांच्याशी संभाषण केले,असे निवेदनात म्हटले आहे.या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर तेली समाजात व कायदेप्रिय नागरिकांमध्ये उमटले आहेत.आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेनेदेखील निषेध व्यक्त केला आहे.एका प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेवर व सन्मानावर या प्रकाराने हल्ला झाला.या प्रकारचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.तेली समाज बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचली असून,या निदनिय घटनेचा निषेध करत आहे.आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता व इतर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी निवेदनातून केली आहे.यावेळी संताजी सेना तालुकाध्यक्ष सुमित सोनोने, संताजी सेना जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अतुल नवघरे,संतोष शिरभाते,राहुल गुल्हाने,स्वप्निल बनारसे,एडवोकेट निलेश सुखसोहळे,विशाल शिरभाते,अंकुश शिरभाते,अतुल गुल्हाने,रवी हरणे, अंकुश सुखसोहळे,गिरीश वनस्कार आदींची उपस्थिती होती.