अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर ती खूप फोटो शेअर करत असते. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता देवदर्शन घेताना दिसत आहे. यावेळी प्राजक्ताने पांढरा शुभ्र चिकनकारी ड्रेस घालून महादेवाचे दर्शन घेतले आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर या मंदिरामधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर कमेंट्सचा पाऊसच पडला आहे.या साध्य सिम्पल लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर आणि भक्ती रसात लीन झालेली दिसत आहे.“सोमवारी, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथचे सुंदर दर्शन लाभले. माझ्या पायाला बांधलाय भवरा. होय…सध्या खूपच प्रवास करत आहे. करोनानंतर सुरू झालेल्या उत्सवांचा आनंद मी लुटत आहे.” असं प्राजक्ताने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. या फोटोंमध्ये प्राजक्ता पांढऱ्या शुभ्र चिकनकारी ड्रेसमध्ये दिसत आहे. चिकनकारी ड्रेसचा ट्रेन्ड सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे.