शाळेत ‘मार्गारेट थॅचर’ बनल्या आणि हरल्या, पण आज इंग्लंडच्या खऱ्याखुऱ्या पंतप्रधान झाल्या, कोण आहेत लिझ ट्रस?

देश – विदेश

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी हुजूर पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची निवड झाली आहे. लिझ ट्रस यांनी हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस आता मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतरच्या त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत. मात्र, शालेय जीवनात लिझ ट्रस मार्गारेट थॅचर बनल्या होत्या. शाळेतील निवडणुकीत लिझ ट्रस यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. लिझ ट्रस या मार्गारेट थॅचर यांची भूमिका पार पाडत होत्या. शालेय निवडणुकीत त्यांना त्यावेळी एक मत देखील मिळालं नव्हतं.लिझ ट्रस या ७ वर्षांच्या असताना १९८३ मध्ये शाळेत त्यांनी मार्गारेट थॅचर यांची भूमिका पार पाडली होती. मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. शाळेत एक निवडणूक घेण्यात आली होती. लिझ ट्रस त्यावेळी मार्गारेट थॅचर बनल्या होत्या. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना एकही मत मिळालं नव्हतं.लिझ ट्रस यांचं लहानपण स्कॉटरलंडमध्ये गले. त्यानंतर त्या उत्तर इंग्लंडमधील लीडसमध्ये स्थलांतरीत झाल्या. ट्रस यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली आहे. लिझ ट्रस यांनी उर्जा आणि दूरसंचार क्षेत्रात देखील काम केलं आहे.

लिझ ट्रस यांनी उदारमतवादी म्हणून राजकीय कारकिर्द सुरु केली. २०१४ मध्ये त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून देखील काम केल आहे. बोरिस जॉन्सन यांनी लिझ ट्रस यांना गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्री म्हणून संधी दिली होती. आता त्या ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *