शेतक-यांनो, यंदा कापूस विक्रीची घाई नको….

अकोला


कापसाचे भाव वाढल्याने सेबी ने कमोडिटी मार्वेâट मधुन कापूस वगळला

कापसाचे उत्पादन घटण्याची चिन्हं
शेतकरी संघटना, राजकीय पक्षांची चुप्पी
कापसाला देशांतर्गत अधिक भाव मिळणार


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची आवक घटण्याचे चिन्हं असताना व केवळ भारतीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन होणार असताना थेट सेबी ने कमोडिटी मार्वेâटमधील कापूस व्यवहारांना एक महिन्यांची स्थगिती दिली आहे. कापसाचे भाव गगनाला भिडणार असल्याचे हे संकेत आहेत.


कापूस उत्पादक शेतकNयांनी कुठल्याही व्यापारी, जिनिंग प्रेसिंग सोबत सौदे न करता कापसाला नेमका काय भाव भविष्यात मिळणार आहे याची खात्री करत निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सेबी ने कमोडिटी मार्वेâट मधील कापूस व्यवहारांना स्थगिती देत कापसाचे दर वधारणार यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब करताना दूसरीकडे शेतकNयांचे हित जोपासले नसल्याची चर्चा शेतकNयांमध्ये आहे. पण, इतका मोठा निर्णय झाला असताना त्यावर शेतकरी संघटना, शेतकNयांचा वैâवारी असल्याचे दाखविणाNया राजकीय पक्षांची चुप्पी का असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील व वेंâद्रातील सरकारने याकडे लक्ष देत कापूस उत्पादक शेतकNयांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी पुढे येत आहे. शेअर बाजारातील नियामक संस्था असलेल्या ‘सेबी’ने कमोडिटी म्हणजे एमसीएक्स वायदे बाजारातील कापूस व्यवहारांना तडकाफडकी महिनाभराची स्थगिती दिली आहे. वस्त्रोद्योग कंपन्या, व्यापारी आणि सटोडियांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याची टीका करत होत असताना विदर्भाच्या कापूस उत्पादक प्रदेशात शेतकरी संघटना, राजकीय पक्षांची या सर्व विषयांवर चुप्पी का असा प्रश्न विचारला जात आहे. तर दूसरीकडे यंदा कापसाला उच्चांकी दर मिळण्याचा अंदाज तंज्ञाकडून व्यक्त केला जातोय. यामुळे शेतकNयांनी कापूस विक्रीची घाई करू नका तसेच एकाच टप्प्यात सर्व कापूस विकू नका असा संदेशही दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *