नागिन च्या पिल्लाने व अंड्याने थांबवले रेल्वेचे काम

अकोला

रेल्वे रुळ खोदाईत आढळले अंडी
नागिणीच्या अंड्याने थांबले काम
बाळ काळणे यांनी सुरक्षित काढली अंडी

अँकर….
साप आणि वन्यजीवांच्या मदतीसाठी धावणाNया बाळ काळणे यांना आज रेल्वे तातडीने बोलवित नागिणीचे अंडे सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी बोलावले. त्यांनी देखील यासाठी जीवाची पर्वा न करता हे कार्य पुर्ण केले.

व्हाईस….
रेल्वे स्टेशन नं सहा वर रेल्वे रूळ खोदाईचे व रुळ फिटिंगचे काम सुरू आहे . रेल्वे मजुरांना काही अंडे दिसली तर अंडे अस्त व्यस्त झालेली होती. तर काही अंड्यातुन सापाची पिल्ले बाहेर आल्याने मजुर वर्गाने कामच बंद केले . कुणीही काम करण्यास तयार नव्हते . ही परिस्थिती बघता सुपरवायजर प्रकाश यादव व येथील अभियंता यांनी ताबडतोब सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांना तात्काळ बोलावले . बाळ काळणेंनी निघालेल्या पिल्लांचे निरिक्षण केले तर ती नागिनची पिल्ले होती . खाली असलेली इतर अंडे अस्तव्यस्त झाली होती. खालचे काहीच दिसत नसल्यावरही तरी बाळ काळणे यांनी इतर खालील अंडी धोकादायक स्थितीतील म्हणजे खालील काहीच न दिसताही सावरून जमा केली . तिथे नागिन असण्याची सुद्धा दाट शक्यता असते. हे अंडे अशा बिकट अवस्थेत जमा करणे जिकरीचेच कार्य होय. इतर इजा झालेले व अस्त व्यस्त अंडे हे बाळ काळणेंनी पृष्टाच्या डब्यात टाकले. याला वनविभागात आणले यातील पिल्लांना जन्म देण्याचा प्रयत्न करू असे बाळ काळणेनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *