वाडेगांव येथे कोरोना प्रतिबंध लसीकरण

अकोला

गणेशोत्सवात लसीकरणास मोठा प्रतिसाद
आरोग्याद्वारे आयोजित लसीकरण शिबिर


आझादी का अमृत महोत्सव व गणेश उत्सव निमीत्त भव्य कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबीराचे आयोजन वाडेगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते.


वाडेगाव येथील हिंन्दु ह्वदय सम्राट गणेश उत्सव मंडळ येथे कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १४० नागरीकांना कोरोणा लसीकरण देण्यात आले यासाठी वाड़ेगांव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधीकारी, हिंन्दु ह्वदय सम्राट गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष शुभम जढाळ, सचिव ओम सोनटक्के,मनीष मसने, किशोर फाळके,निलेश मसने,प्रक्षित फाळके इत्यादी नी सहकार्य केले. गणेशोत्सवात कोरोना लसीकरण करण्यात आले असून यामुळे लोकांची मोठी सोय झाली होती. आरोग्य विभागाने यासाठी विशेष पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *