विशेष पथकाची ग्राम लाखपुरी येथे धाड

अकोला


गावरान मोहा दारू व देसी दारू वर धाड
विशेष पथकाने केली मोठी कारवाई


विशेष पथकाच्या वतीने केलेल्या कारवाईत हातभट्टीची दारु चा अड्डा उदध्वस्त करण्यात आला. या प्रकरणात दोन लाखांचा मुद्देमाल व सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली.


मूर्तिजापूर तालुक्यात अवैध धंद्यावर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली होती. ग्राम लाखपुरा येथे गावरान मोहा हातभटी ची दारू काडून विक्री करीत आहे. एक इसम हा देसी दारू ची वाहतूक करीत आहे तेथे पाहणी केली असता पाच इसम लाखपुरी अवैध रित्या मोहा हातभटी ची दारू बनवताना व विक्री करताना मिळून आले त्यांच्या जवळून देसी मोहा दारू व दारू बनिवण्याच्या पावणे दोन लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *