अंकुश अबोलीच्या आयुष्यात उभा ठाकणार भूतकाळ; मालिकेत सोनियाची रिएंट्री

Entertainment

मुंबई, 10 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील अबोली मालिका गेली अनेक महिने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अबोली आणि अंकुश यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. अडखळत बोलणारी अबोली आणि तिचा इन्स्पेक्टर नवरा अंकुश अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मालिकेत एकामागून एक अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. अंकुश आणि अबोली यांच्यात हळू हळू का होईना प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी पुन्हा एकदा आनंदानं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मालिकेत सध्या अबोली आणि अंकुश यांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. या लग्नात सोनिया नावाचं वादळ येणार आहे.

अंकुश अबोलीचा तिरस्कार करण्याचं मुख्य कारण होत ते म्हणजे सोनिया. अंकुशची पहिली गर्लफ्रेंड आणि अबोलीची बेस्ट फ्रेंड सोनियाची मालिकेत एंट्री होणार आहे. सोनियाच्या मृत्यूनंतर अंकुशला नाइजास्तव अबोलीशी लग्न करावं लागलं होतं. अबोलीनं देखील अंकुश मन जिंकली. सोनियाला विसरून अंकुश अबोलीबरोबर नवी सुरूवात करत असताना सोनिया दोघांच्या आयुष्यात परत येणार आहे.

मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात दाखवण्यात आल्यानुसार, अंकुश आणि अबोली यांची हळद दणक्यात सुरू असते. दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात. तितक्यात एक बाई डोक्यावर पदर घेऊन मंडपात येते. ती बाई सोनिया सारखी दिसत आहे. ती खरंच सोनिया आहे की सोनियासारखी दिसणारी दुसरी कुणी हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अबोली आणि अंकुश यांची सुरू असलेली हळद पाहून मंडपात आलेली सोनियासारखी दिसणाऱ्या बाईला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर सोनियाचा लुक देखील पूर्णपणे बदल्याचं दिसत आहे. आधीची सोनिया फार मॉर्डन होती नवी सोनिया साडीत, डोळ्यात मोठं काजळं भरलेली दिसत आहे. आता सोनियासारख्या दिसणाऱ्या मुलीच्या येण्याचा अंकुश आणि अबोली यांच्या नात्यावर काय परिणा होणार? दोघांचं लग्न होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *