गणपति मिरवणूक दरम्यान…
मशीद आली अन; डिजेवर कव्वाली सुरु झाली !

अकोला

काल वाशिम मध्ये गणपति मिरवणूकी दरम्यान हिन्दू – मुस्लिम एक्याचे दर्शन पहावयास मिळाले आहे.झालं अस संध्याकाळ होतांना गणपति विसर्जन मिरवणूक बागवान पूरा येथील तोडगांव मशीद जवळ पोहचली दरम्यान समाजात जातीय सलोखा कायम राहावं यासाठी वाशिम येथील चामुंडा देवी गणेशोत्सव मंडळाकडून डीजे मध्ये कव्वाली लावण्यात आली. त्यामुळे मुस्लिम बाँधव सुद्धा या डिजेच्या तालावर थीरकतांना दिसून आले.या क्षणांचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरात व्हायरल होत असून अनेकांच्या मोबाईलवर स्टेटस ही ठेवले जात आहे.हा विषय सध्या चांगलाच चर्चेचा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *