बोर्डी येथे विजेच्या धक्क्याने रेड्याच्या मृत्यू

अकोला

रेड मालकाचे 60 ते 70 हजारे नुकसान

अकोट : बोर्डी येथील शेतकरी वासुदेव नामदेव वनकर यांच्या मालकीच्या सात वर्षाचा रेड्याचा वीजेच्या धक्क्याने म्रुत्यु झाला. सदर्हु शेतकऱ्यांने आपले गुरेढोरे चरायला सोडले असता त्यापैकी रेड्याचा विजेच्या खांबाच्या तानाला स्पर्श होउन त्यामध्ये असलेल्या करंटमुळे जागीच मृत्यू झाला. शेतकर्यांवर आधीच नैसर्गिक आपत्ती असतांना, उत्पन्नात घट,कमी भाव अशा अनेक संकटाचा सामना करत असतांनाच करंट लागुन रेड्याच्या मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे 60 ते 70 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. यासंबंधी शेतकरी वासुदेव वनकर यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार केली व वीजवितरण कंपनी उमरा येथे फोन केला असता वीज वितरण कंपनीचे अभियंता आर.पी. चांदुरकर यांनी पंचासमक्ष पंचनामा केला त्यात नमूद केले की दिनांक 6 सप्टेंबर 2022 ला दुपारी अंदाजे 2.25 वाजता वासुदेव नामदेव वनकर राहणार बोर्डी यांच्या मालकीच्या रेड्याला वॉटर सप्लाय डीपीवरील वॉटर सप्लाय कनेक्शन असलेल्या सिमेंट पोलला असणाऱ्या तानाला स्पर्श झाल्याने करंट लागून अपघात घडला त्यात रेड्याचा जागीच मृत्यू झाला अशा प्रकारचा अहवाल तयार केला व पशुधन अधिकारी यांनी रेड्याचा पोस्टमार्टम करून पुढील कारवाईसाठी पंचनामा वरिष्ठाकडे सादर केला. करंट लागून रेड्यांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे 60 ते 70 हजार रुपये नुकसान झाले आहे. तरी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *