शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर

अकोला

अकोला जिल्ह्यातील विरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून शहीद स्मारकाच्या बांधकामा साठी अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. देशासाठी बलीदान दिलेल्या जिल्ह्यातील विरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सदर शहीद स्मारक अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. जिल्ह्यातील 24 शहीदाचे सतत स्मरण व प्रेरणा मिळावी यासाठी शहरातील नेहरु पार्क जवळील शहिद स्मारकांचे नुतनीकरण करुन शहीदाचे पुतळे व त्याच्या कार्याच्या माहितीसह उभारण्यात येणार आहे. याठिकाणी दोन फवारे तसेच पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी सेल्फी पाईंटसुध्दा तयार करण्यात येणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. तसेच अग्रस्थानी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्मारकाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असेन लवकरच शहीद स्मारक सर्वसामान्य नागरिकांन साठी सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *