राज राजेश्वर कम्युनिकेशन अर्थात आर आर सी नेटवर्कचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांनी लावलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. केबल नेटवर्वâच्या माध्यमातून अकोलेकरांच्या घराघरात आर आर सी नेटवर्क पोहचले आहे. अकोलेकरांच्या मनोरंजन व माहितीसाठी सतत काम करण्याचा आणि केवळ त्यासाठीच उभे करण्यात आलेले आर आर सी नेटवर्वâ आता केवळ अकोल्यापुरतेच मर्यादीत न राहता ते आता पश्चिम विदर्भ, महाराष्ट्र आणि जगात बघितले जाणारे प्रमुख माध्यम झाले आहे. आर आर सी नेटवर्वâ जगात पाहिल्या जात असल्याचा पुरावाच यु ट्युब ने दिल्याने इतर प्रमाणपत्रांची आवश्यकता राहिली नाही. माध्यम क्षेत्रातील तरुण नेतृत्व आणि आर आर सी नेटवर्वâचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या कल्पक आणि आधुनिक विचारांनी प्रगतीची आधुनिक द्वारे खुली झाली आहेत. यु ट्युब ने आर आर सी नेटवर्वâ च्या आर आर सी डिजिटल अकोला या यु ट्युब चॅनल ला सिल्वर बटन देत कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या कार्याचा गौरवच केला आहे.
आर आर सी डिजिटलवरील बातम्या आणि मनोरंजन कार्यक्रम पाहणाNया दर्शकांची एकत्रित संख्या ही तीन कोटी ३६ लाखांच्या वर झाली आहे. कोट्यावधी दर्शकांचा हा विश्वास निश्चितच निःस्पृह, निःपक्ष, निर्भिड आणि लोकाभिमुख माध्यम असल्याचा पुरावा देणारा आहे. आर आर सी च्या यु ट्युब चॅनलला बघता बघता एक लाख २६ हजार सबस्क्राईबर्स रोज फॉलो करतात. एका छोट्या रोपट्याचे वटवृक्ष होण्यात सर्वात मोठा वाटा हा दर्शकांचा आहे. दर्शकांनी आर आर सी नेटवर्कवर विश्वास दाखविल्याने हा टप्पा आम्ही ओलांडू शकलो आहे. हीच काय ती परिस्थिती आर आर डिजिटल च्या फेसबुक पेज ची आहे. भविष्याची आर आर सी डिजिटल ची वाटचाल ही निश्चितच एका ओटीटी प्लॅटफार्म स्थापन करण्याकडे राहणार आहे. एक स्वतंत्र मिडिया हाऊस जी लोकशाहीत, लोकाभिमुख व लोकहितासाठी लढणारे व त्याच बरोबर दर्जेदार मनोरंजन देणारे माध्यम समुह म्हणून आर आर सी नेटवर्वâ समोर येत आहे.
गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास आर आर सी ने अनेक लाईव्ह प्रसारण केलीत. या प्रसारणात श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण अकोल्यात करण्यात आले. त्याच बरोबर देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिनी आझादी ७५ फॅन्सी ड्रेस कॉम्पीटिशन हजारो शाळकरी विद्याथ्र्यांचे कलागुण समोर आणणारी ठरली. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराचा कावड महोत्सव हा राजेश्वरोत्सव या नावाने साजरा करण्यात आला. या लाईव्ह इंव्हेट ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. संपुर्ण महाराष्ट्रात केवळ आर आर सी च्या माध्यमातून राज राजेश्वराच्या कावड व पालखी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण हे जगभरात दाखविले गेल व ते मोठ्या उत्साहात पाहिले गेले. दर्शकांनी या सर्व सोहळ्याला भरभरुन प्रतिसाद दिला. अकोल्यातील क्रिकेट टुर्नामेंट असो की, इतर कुठलेही छोटे मोठे इव्हेंट असो, ते आता आर आर सी नेटवर्वâ च्या माध्यमातून जगभरात पाहिले जात आहे.
अकोला लोकल ते ग्लोबल करण्यात आर आर सी चा सिंहाचा वाटा आहे. गणेशोत्सवात देखील शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे कव्हरेज, अकोल्यातील गणेशोत्सवातील महत्वपुर्ण घडामोडी या आर आर सी ने दाखविल्या. त्याच बरोबर दरवर्षी प्रमाणे यंदा ही गणेश विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रसारण करण्यात आले. हे सर्व करताना आर आर सी नेटवर्वâ चे सर्व केबल ऑपरेटर्स, त्यांची टिम,फिल्डवर कार्यरत टिम, रिपोर्टर, कॅमेरामन व व्हिडीओ एडिटींग आणि ब्रॉडकॉस्ट करणारी टिमचे मोलाचे सहकार्य लाभले. याच बरोबर अतिशय स्ट्राँग संपादकीय टिमच्या माध्यमातून अचुक प्रसारण करण्यात आर आर सी नेटवर्वâ अग्रेसर आहे. आर आर सी नेटवर्वâच्या सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट च्या वाचकांची संख्या लाखोत आहे. त्याच बरोबर आर आर सी डिजिटल हे पोर्टल देखील वाचकांपर्यत जलद गतीने बातम्या व माहिती पोहचविणारे सशक्त माध्यम म्हणून समोर आले आहे.
अकोल्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी आमच्या संचालिका सौ. कल्पनाताई देशमुख व सौ. ऋतुजा देशमुख यांच्या संकल्पनेतील सिटी मैत्रीण या ग्रुप व कार्यक्रम मोलाचा हातभार उचलत आहेत. सिटी मैत्रीण च्या माध्यमातून सामान्य महिलांचा व गृहिणींचा आवाज बुलंद होत आहे. तर मैत्रीणींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुण जगासमोर आणण्यासाठी सिटी मैत्रीण ग्रुप मध्ये शेकडो महिलांचा वाढता सहभाग मोलाचा ठरत आहे. महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांचे उत्तर शोधणे, महिलांची सहल व विविध सणांच्या माध्यमातून एकत्रिकरण त्याच बरोबर समाजातील गरजुंना आवश्यक ती मदत देण्यात सिटी मैत्रीण चा पुढाकार समाजाभिमुख आहे. अकोल्यातील प्लास्टिक मुक्तीसाठी सिटी मैत्रीण ने कापडी पिशव्यांची निर्मिती व मोफत वाटप करत पर्यावरण रक्षणासाठी महत्वपुर्ण भुमिका हाती घेतली आहे.
सोशल मिडिया हा जगात सर्वात सशक्त माध्यम म्हणून समोर आला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आर आर सी ने देखील एका विश्वास दर्शकांमध्ये निर्माण केला आहे. आर आर सी नेटवर्क च्या सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट, आर आर सी न्यूज, सिटी लाईव्ह या माध्यमातून बातम्यांबरोबर मनोरंजन, माहितीचा खजीना जगासमोर रोज येत आहे. त्याच बरोबर हॅलो डॉक्टर या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात व योग्य ते वैद्यकिय माहिती दर्शकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य आर आर सी ने सुरु केले आहे.
आजच्या वर्धापन दिनाच्या दिवशी कोट्यावधी दर्शकांचा विश्वास आणि लाखो दर्शकांचे पाठिंबा याच बरोबर चौवीस तास सेवेत असणारे आमचे सर्व केबल ऑपरेटर्स व त्यांची टिम यांच्यासह आमचे जाहिरातदार, हितचिंतक, वाचक, वार्ताहर, तांत्रिक टिम यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. त्याच बरोबर तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत गतीने माहिती पोहचविणारे आर आर सी ब्रॉडबँड ही इंटरनेट सुविधा , त्याच बरोबर आधुनिक स्टुडीओ, हायटेक वॅâमेरा, लाईव्ह प्रसारण करण्याची अत्याधुनिक यंत्रणा आर आर सी नेटवर्वâचे शक्ती वेंâद्र झाले आहे. आर आर सी नेटवर्वâ च्या यशात कोट्यावधी दर्शकांचा विश्वास आणि लाखो दर्शकांचे निरंतर पाठिंबा त्याच बरोबर आमच्या सर्व हितचिंतकांबरोबर जाहिरातदारांचा मोलाचा आमच्या यशस्वी वाटचालीत आहे. भविष्यात आर आर सी नेटवर्क अधिक लोकाभिमुख होण्याचा संकल्पच आजच्या वर्धापन दिनी पुनःश्च आम्ही करत आहोत. कोट्यावधी दर्शकांच्या मदतीने लोकल अकोला ग्लोबल पातळीवर नेण्याचा हाच यशस्वी मार्ग ठरेल.