अकोला : समाजाचे दिशादर्षक म्हणून देशाचे भावी आधारस्तंभ तयार करण्याची महत्वाची जबाबदारी ही जाणीवपूर्वक पार पाडताना संस्कारीत पिढी तयार करण्यासाठी शिक्षकाची नेहमीच धडपड अभिमानास्पद आहे. आज अनेक आव्हाने असताना न डगमगता शैक्षणिक, सामाजिक व सर्व प्रकारची जबाबदारी पेलण्यास का शिक्षक समर्थ पने पार पाडताना आपणास नेहमी दिसतात म्हणून माजी राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या वतीने आर एल टी कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग वतीने कृतिशील शिक्षक पुरस्कार 2022 हा सहृदय सन्मानाने देण्यात आला शैक्षणिक योगदानाची जाणीव असून विद्यार्थ्यांना नवनिर्मितीच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड ही गुरुजींची कौतुकास्पद आहे.समृद्ध भारत आणि सामाजिक प्रवाहात नवीन पिढी कशी येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहून श्रेयसाकडून निश्रेयासाकडे जाणाऱ्या निष्काम कर्मयोगाच्या कृतिशिलतेसाठी आणि राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी असलेल्या पवित्र कार्यास शिक्षक नेहमीच अग्रीम स्थानी असतो त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कृतीशिल पुरस्कार शिक्षकांना देऊन गुणगौरव करण्यात आला.